Skip to main content

जमलेल्या माझ्या तमाम...........सदाशिव पेठेतल्या नागनाथ पाराजवळ पुणे महानगरपालिकेची पाटी वाचली "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्म ठिकाण",

सदाशिव पेठेतल्या नागनाथ पाराजवळ पुणे महानगरपालिकेची पाटी वाचली "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्म ठिकाण", का कुणास ठाऊक पण मला लहानपणी शाळेच्या ट्रीपला कोकणात गेलो असताना "चिखली" या गावातील वाचलेले पाटी आठवली "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे हे जन्मस्थान"
कोणतीही राजकीय किंवा चळवळीची पार्श्वभूमी अथवा भक्कम आर्थिक पीढीजात असलेली इस्टेट असं काहीही नसताना फक्त प्रबोधनकारांच्या प्रखर पुरोगामी विचारांचे संस्कार यावर शून्यातून एक राज्यव्यापी संघटना उभी करण्याचे कसब असलेला जगातील एकमेव नेता "बाळ केशव ठाकरे" शिवसैनिकांचा विठ्ठल आणि सर्वांसाठी असलेले "बाळासाहेब"
एखाद्या इंग्लिश किंवा हिंदी चित्रपटाच्या हिरोला शोभेल अशी स्टाईल मोठ्या फ्रेमचा चष्मा आणि बाहेर असतील तर तसाच गॉगल. ओठत धूर सोडणारा पाईप आणि मग त्यातून निघणारे शब्दांचे अंगारे.
त्यावेळेस पांढरी टोपी आणि जॅकेट घालणाऱ्या त्या टिपिकल नेत्यांना नक्कीच त्यांचा हेवा वाटत असेल. स्वतःवर कधीही वैयक्तिक भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडणार नाहीत याची पक्की खात्री असल्यामुळेच बाळासाहेबांनी कधीही पांढरी टोपी आणि जॅकेट घातले नाही.
बीबीसीच्या एका ब्लॅक अँड व्हाईट डॉक्युमेंटरीत मुंबईत रोड इंटरव्यू मध्ये त्या इंग्रजी पत्रकाराला तोंडात पाईप ठेवून अस्खलित इंग्रजी आन्सरिंग करणाऱ्या बाळासाहेबांना बघितल्यावर वाटतं आणि हेच का ते जे भर प्रचार सभेत लाखोंच्या जनसमुदायासमोर गांडू हा शब्द बिनधास्त बोलतात.
स्वतः प्रशासकीय सत्तेत सहभागी न होता सुद्धा ज्यांनी महाराष्ट्राला दूरगामी विचार करून मुंबई-पुणे एक्सप्रेस वे सारखा त्याकाळचा आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या महामार्ग दिला असे हे बाळासाहेब.
मला अजूनही 1998 सालची पुण्यात सारसबाग चौकात झालेले प्रचार सभा आठवते. मी बाजीराव रोड साईडला गरवारे बालभवनच्या जवळ रस्त्यावर बसलो होतो. मंचाच्या उजव्या बाजूने साहेब त्यांची ती नेहमीची शॉल खांद्यावर अधून-मधून टाकत बोलताना दिसत होते अर्थातच खूप दूरवर दिसत होते ते भाजपचे त्यावेळेसचे टॉप मोस्ट फायरब्रँड प्रमोदजी महाजन.
भाषणामध्ये बाळासाहेबांनी मेधा पाटकर पासून ते महाराष्ट्रातले विविध राजे आणि त्यावेळच्या दिल्लीच्या राण्या यांची जी काही काढली.. ते शब्द अजूनही डोक्यातून जातच नाहीत.
"जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो"... तमाम या शब्दाचा खराखुरा अर्थ जर समजून घ्यायचं असेल तर साहेबांचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा. तमाम या शब्दाला शब्दशः ठरवणारा एकमेव नेता. कारण तिथली गर्दी जमवली नसायची तर स्वतःहून प्रेमाने उत्सुकतेने आलेली असायची
त्यांच्या या एका सुरुवातीच्या वाक्यात एवढी ताकद होती की त्या वाक्यानंतर जर साहेब कधी म्हणाले असते "अरे भडव्यांनो इथं काय बसलाय उठा आणि तो शेजारचा सुई एवढ्या देश संपून टाका" तर भारलेले संपूर्ण शिवतीर्थ एका क्षणार्धात उठून उत्तरेकडे कूच केली असती. ही ताकद होती या वाक्यात आणि त्यातून रक्त खवळून निघत होते आणि लोक भारावून जात होते.
कुठल्या विषयावर साहेबांचा शब्द भाष्य शेवटचा असायचं. एकदा का त्यांनी एखाद्या विषयावर भाष्य केले की त्यावर प्रतिवाद करण्याची ताकद काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कोणाचीच नव्हती.
शिवसेनेच्या चिन्हा प्रमाणे अस्सल वाघ होते बाळासाहेब. वाघाची जशी छोट्या-मोठ्या हरिण, माकड, काळवीट आणि हत्तींपासून ते सिंहापर्यंत जरब असते तशीच जरब ह्या वाघाची राजकीय आणि सामाजिक कार्यात होती किंबहुना अजूनही अदृश्यपणे आहेच.
बाळासाहेब ठाकरे या नावात असं गुढ होतं की जसं मुंबई बाहेरच्या माणसाला मुंबई बद्दल एक अनामिक भीती तर असते पण कायम उत्सुकता लागून राहिलेली असते मुंबईत जायची. तशीच काहीशी उत्सुकता आणि अनामिक भीती ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बाळासाहेबांबद्दल होती आणि म्हणूनच अगदी मायकल जॅक्सन, जावेद मियांदाद पासून ते आपले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पर्यंत सर्वांनी मातोश्रीवर मुंबईत आल्यावर हजेरी लावलेली आहे.
अफजल खान जसा प्रतापगडावरून म्हणला होता कोण आहे हा शिवाजी का बच्चा मेरे सामने असे कित्येक अफजल खान मुंबईत यायच्या आधी बाळासाहेबांन बद्दल विविध विधानं करून मुंबईत आले. परंतु एकदा का ते मातोश्रीच्या गेट पाशी आले त्यांची फाटायचीच. एवढी सिक्युरिटी एका माणसासाठी आणि ती सुद्धा स्वतःच्या लोकांची आणि विनामोबदला फक्त साहेबांसाठी या विचारानेच दडपून जायचे आणि साहेब भेटल्यावर मग नतमस्तक व्हायचेच.
"मुझे हर कोई अपने अपने नजरीये से देखता है और मत बना लेते है" लेकीन
"मुझे जो सही लगता है, वो मै करतां हुं। फिर वो सरकार के खिलाफ हो, सिस्टीम के खिलाफ या फिर समाज के खिलाफ"
हा राम गोपालच्या सरकार मधला डायलॉग तंतोतंत त्यांच्यावरच होता. कधी कधी मला शिवसेना हा प्रवास त्या रॉबर्ट डीनीरो आणि अल् पचीनोच्या गॉडफादर पिक्चर सारखाच चालू आहे की काय असे वाटते.
मनमोहन देसाईच्या अमर अकबर अँथनी मध्ये जसं आईला एकाच वेळेस तीन मुले रक्त देतात हा प्रसंग दाखवला आहे तसंच काहीसं मला वाटतं की ऍक्च्युली बाळासाहेबांनी एकाचवेळेस लाखो शिवसैनिकांना त्यांचे रक्त दिले असेल. ज्याचा रंग भगवा आणि रक्तगट H पॉझिटिव्ह.
हया दिलेल्या रक्ताचा इफेक्ट इतका आहे की अजूनही सामना हे एकमेव असे वृत्तपत्र आहे जे बेधडकपणे अग्रलेख लिहू शकते. आणि त्यावेळेससुध्दा व्यंगचित्रातून वर्मावर बोट ठेवणारे मासिक म्हणून मार्मिक हे नाव दिले असेल
पॉलिटिकल स्टार्टअप चे उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना आणि लीडरशिप चा उत्तम नमुना म्हणजे बाळासाहेब.
आय (I) असून सुद्धा आय (I) नाही तर वुई (WE)चे उत्तम उदाहरण. पुढची फळी तयार करून त्या फळीतल्या नेत्यांना मोठे करणे हे गुण त्यांच्यात होते.
Right Job Right Person; Motivation; Timely Appreciation
हि लीडरशिपची त्रिसूत्री कशी अमलात आणावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाळासाहेब.
जसं घटना जात पात धर्म पंथ लिंग यात कोणताही भेदभाव न करणारी असते तसेच हिंदुस्तानातील एकमेव नेता म्हणजे बाळासाहेब
त्यांची बायप्रॉडक्ट प्रतिकृती होण्याची त्यांच्या काळात किंवा नंतरच्या काळात सुद्धा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला परंतु शेवटी बाळासाहेब नावाचा सह्याद्री हा एकच बाकी सगळ्या पर्वतीच्या टेकड्याच.
2012 साली जर यमाने विचारले असते तर लाखो सैनिक तयार झाले असते त्या "होता जीवा म्हणून वाचला शिवा" सारख्या जिवासारखी बलिदान करायला.
आजसुद्धा "साहेब असते तर...." असं म्हंटलं कि कितीही बेडर नीडर असला तरी सच्च्या सैनिकाच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतंच. आणि म्हणूनच खात्री पटते की होतेच ते खरे "हिंदुह्रदय सम्राट".
साहेब तुमचा तो रुद्राक्ष धारण केलेला आशीर्वाद रुपी हात सदैव शिवसेना आणि सैनिकांच्या पाठीशी राहो हीच त्या श्रीं कडे इच्छा.
साहेब तुम्हाला भावपुर्ण श्रध्दांजली💐
आपलाच एक चाहता....🙏🙏
----मिलिंद सहस्रबुद्धे ©

Comments

Popular posts from this blog

रस्ता..

 रस्ता.. घरातून घाईघाईने निघतांना मनात काय काय चालू असतं ना. वेळेत पोहचू की नाही, वाटेत ट्रॅफिक चा शॉट नसेल ना. दुपारी लंच नंतर महत्वाची मिटींग आहे आज. त्यात काय दाखवायचं, काय बोलायचं. संध्याकाळी आल्यावर काय स्वयंपाक करायाचा... सकाळची पोळी भाजी पटापट आवरली. सगळ्यांना आवडते म्हणून कांदा टोमॅटो कोशिंबीर केली, त्यात जरा वेळ गेला.  परवा जेवताना मी आईला असं पटकन बोलायला नको होतं. सारखं मनात तेच येतयं, बघू जमलं तर योग्य वेळ बघून विषय क्लिअर करेन. असं असं बोललं तर? पण, आवडेल का तीला ते, नको जरा सामोपचाराने सविस्तर बोलू.  बापरे लाल पडला का? गेली इथंच ३ मिनिटे. पुढच्या चौकातला सिग्नल continued मिळाला तर बरं. वेळेत पोहचले म्हणजे झालं, मोठे सर यायच्या आत. वा सुटला बाबा, इथं जरा गाड्या कमी आहेत ते एक छान आहे. पुढच्या रविवारी ताई येणार घरी. त्यांना येताना कयानीचे केक आणायला सांगते. हल्ली कैम्पात जाणं होतंच नाही. ताई येणार म्हणजे घर चकाचक आवरणं आलं. नाहीतर सासुबाईंन समोरंच ऐकावं लागेल. हसुंच येतं मला दरवेळेस कितीही आवरलं तरी काही तरी असतंच त्यांचं.  "अहो अहो" आजोबा रस्त्यातच काय म...
"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ...

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...