Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020
शिर्षक मुद्दामच शेवटी लिहलयं... वाचतांना तुम्हाला सुचतयं का बघा.. आणि सांगा.               जाग आली अन् बघते तर काय सहा वाजून गेलेले. पटापट आवराआवरी केली आणि किचनमध्ये आले.  चहा टाकला पटकन. बाहेरचं वातावरण बघून कळतच नव्हतं सकाळ झाली का संध्याकाळ. सध्या रात्र काय दिवस काय आणि पहाट काय आणि संध्याकाळ काय. सगळं सारखंच वाटतंय कारण पक्षी दोन्ही वेळेस ओरडतात आणि कुत्री कायमची भुंकणं बंद झाली आहेत.  जरा शुद्धीवर आल्यासारखी झाल्यावर कळले की संध्याकाळ झाली आहे. दुपारचे जेवण झाल्यावर ओटा आवरला. नंतर त्या व्हाट्सअप फेसबुक बघण्याच्या नादात कधी डोळा लागला कळलेच नाही. सध्या रोजच रविवार. भरगच्च नाश्ता तोसुद्धा वैविध्यपूर्ण आणि दुपारचं जेवण उशिरा तेसुद्धा चारीठाव.  दुसरा उद्योगच नाही. मग काय "पन्नास रुपये अनलिमिटेड थाळी" च्या पाटी सारखी मेस झालंय आमचं किचन. ह्यांना चहा दिला. ह्यांना म्हणजे एरवी सुहासला मी अरे-तुरेच करते पण तुमच्या समोर म्हणून ह्ययांना बरं का.  तर सुहासला चहा दिला आणि बेडरूममध्ये अदिती खेळत होती एकटीच. अर्थातच एकटी नव्हती तिचा...
खिचडी.. नेहमीप्रमाणे संध्याकाळी ऑफिसमधून घरी आलो कुलूप उघडले. सैक टाकली आणि टीव्ही लावला, ऑस्ट्रेलिया- इंग्लंड क्रिकेट मैच चालू होती. पाटीवरचा निरोप वाचला "खिचडी केली आहे, गरम करून घ्या छान". संध्याकाळचे साधारण सात साडेसात वाजलेले, मनात म्हटलं छान आटपू आणि गरमागरम डाळ तांदूळ खिचडी दूध-तूप घालून, बाजूला लिंबाचं लोणचं टॉक्, जमलं तर एखादा पापड भाजू गैसवर... मस्त फ्रेश झालो आणि ओट्यापाशी आलो. पातेल्याचे झाकण उघडलं आणि बघतो तर काय? च्यायला.. दूध खिचडीला विरजण लागलं ना. खिचडी म्हणजे साबूदाण्याची खिचडी केली होती. फुल पोपट झाला. मग लक्षात आलं अरे हा! आज संकष्टी चतुर्थी होती ना... म्हणून सकाळचा उरलेल्या साबुदाणा बाईसाहेबांनी "तुम्हाला आवडते ना" या नावाखाली (सरकवलेला) शिजवलेला दिसतोय. 'छान' 'सुंदर' 'अय्या किती गोड' असे शब्द हिने वापरले ना! की का कुणास ठाऊक उगाच मनात शंका चुकचुकतेच. आत्ता ही तसचं झालं "गरम करून घ्या छान" कसं आहे बघा, काही पदार्थ हे ज्या त्या वेळीच खाण्यात जी मजा आणि रंगत येते ना, ती इतर वेळी नाही. साबुदाणा खिचडी म्हणज...
"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ...