Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

T(ती)चा चहा

T(ती)चा चहा       "रुपाली, आज असा काय झालायं गं चहा! नेहमीसारखा नाही झालाय. बघ काहीतरी कमी आहे, काय ते सांगता येत नाही". असं जेव्हा असतं ना 'काय ते सांगता येत नाही' ही चव ज्याची त्याची असते. तो किंवा ती कोणीही असेल ती ते नीट सांगू शकत नाही. 'चहा' आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक.  म्हणे चीनमध्ये त्याचा शोध लागला आणि साहेबांनी म्हणजे ब्रिटिशांनी त्याला भारतात आणला. तो हा चहा, चाय, टी आणि अशी बरीच काही नाव आहेत त्याला.  या चहाची एक चव असते विविध प्रदेशात, विविध लोकांना, विविध वेळी आणि विविध ठिकाणी वेगवेगळी ती असते. कोणाला खूप गोड आवडतो तर कोणाला कडक स्ट्रॉंग लागतो.  कोणाला वेलची घातलेला तर कोणी मसाला घातलेला. कोणाला आलं (अद्रक) पाहिजेच चहात. कोणाला दुधाचा तर कोणी बिन दुधाचा. लेमन टी, ग्रीन टी, जास्मीन टी वगैरे वगैरे. अजून असे चहाचे बरेच प्रकार आहेत पण 'ज्याचा त्याचा चहा वेगळाच असतो'. आणि काही झालं तरी त्याला तोच चहा आवडतो.  कोणाकडे पाहुणे म्हणून आपण गेलो की चहा दिला जातो. अगदी तो चहा पिऊन सुद्धा आपण त्यांचे आदरातिथ्य आणि ते कुटुंब कसे आहे ते ठरवत ...

मकबूल फिदा खान....

मकबूल फिदा खान.... हॉलीवूड मधील डेंजील वॉशिंग्टन हे नाव असं आहे की, "एखादा इंग्लिश मूवी बघू, अरे डेंजील वॉशिंग्टन आहे का? चल भारी असेल मग". जरा तसंच हिंदी पिक्चरच्या वेळेस "इरफान आहे का? तर मग बघूच, चांगला असेल नक्की" असं वाटावं असा Born Actor.  ज्याच्या फक्त नावामुळे पिक्चर बघावा, त्या पिक्चर मध्ये आपल्याला काहीतरी बघायला मिळेल असं वाटावं. वास्तववादी पिक्चर बघायची ज्यांना आवड आणि नशा आहे ना, त्यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीने काही हिरे नेहमीच राखून ठेवलेले आहेत. अर्धसत्य मधला घामाघूम होवून धावत पळणारा इन्स्पेक्टर ओमपुरी असेल, "मुंबई का किंग कौन? भिक्कू म्हात्रे" म्हणणारा मनोज वाजपेयी असेल, सरकार मधला के के मेनन असेल, नाहीतर मग "भाई.. सोडा बाॉटल की किंमत तब तक जबतक की वो बंद...जैसे ही बुच खुला...फुस्स..झाग बह जाता है...रह जाता है क्या...पानी" वाला आन मधला पठाणवाडीतला पठाण इरफान खान असेल. हया सर्वांचा एक वेगळाच वरचा क्लास आहे. म्हणजे दहावी फ असून सुद्धा हे सगळेजण बोर्डात आलेले आहेत. हो बरोबर ओळखलंत..आज इरफान खान. उत्तर प्रदेश मधील पठा...

समुद्र...... प्रत्येकासाठी वेगळा असतो...

समुद्र...... प्रत्येकासाठी वेगळा असतो. प्रेमींसाठी नभ-धरा मिलनाचा किनारा असतो.. शोध घेणा-यासाठी सागरतळ एक गूढ असतो.. बाल मनासाठी तो एक लाटांचा खेळ असतो.. तर एकांतात आपलासा वाटणारा मित्र असतो.. मलापण समुद्राचं हे अनाकलनीय आकर्षण नेहमीच विचार करायला लावणारं आहे. हया विचारमंथनातूनच समुद्र आणि मानवी आयुष्याचं जे संलग्न नातं आहे ते सुचत गेलं आणि तेच मांडण्याचा मागील आठ दिवस प्रत्येक दिवशी माझ्या फेसबुक स्टोरीमध्ये प्रयत्न केला. आज आठवड्याच्या आठवणी एकत्र गोळा करून तुमच्यासमोर मांडतोय. बघा आवडतायत का!! © समुद्र......खोल आत आत जात गेलं की वरवरचं वाटणारं काळं वाळूने गढुळलेलं पाणी स्वच्छ पारदर्शी होऊ लागतं. सागर तळाशी असलेला वाळूचा प्रत्येक कण स्पष्ट दिसू लागतो. आपण म्हणतो वाळू काळी आहे पण तळाशी तर ती कायम सफेद, पांढरी स्वच्छच असते. मानवी मनासारखंच की, वरवरची वहात आलेली विचारांची वाळू जरी काळी गढूळलेली असली तरी अतंरगच्या तळाशी जन्म घेतांना उरलेली नाळ निरागसच असते.. जेवढं खोल जाऊ तेवढं हे निरामय निर्गुण विश्व उलगडायला लागतं. © समुद्र.....अथांग किनार्यावर उभं राहीलं ना की आपोआप ...

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी...