Skip to main content

Posts

Showing posts from July, 2020

बारा दुणे बावीस??

बारा दुणे बावीस?? काही योगायोग जुळून आले तर "सोने पे सुहागा" असं आपण म्हणतो. असे योग जुळून यावेत असं आपल्याला वाटत असतंच असं नाही. पण समजा आलेच चुकून जूळून तर नक्कीच काहीतरी महत्वाकांशी घडेल याची जाणीव अथवा खात्री मात्र आपल्याला असते. महाराष्ट्राच्या राजकारणात दोन तुल्यबळ व्यक्तिमत्त्वांच्या जोड्या आणि योगायोग असा की त्यांच्या जन्मदिवसाच्या तारखा सारख्याच. एक सर्वश्रुत असलेली तारीख म्हणजे १२. बारा म्हटलं की आठवते किंवा डोळ्यासमोर येते ते पुणे (MH-12), बारामती आणि १२डिसेंबर. हो बरोबर ओळखलंत! १२ डिसेंबर; अर्थातच माननीय शरद पवार साहेबांचा वाढदिवस. तेवढेच वलय लाभलेला, जनमानसात तळागाळात रुजलेला आणि पक्षात नावाजलेला दुसरा माणूस अर्थातच स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे. त्यांची पण जन्म तारीख १२ डिसेंबर.  निव्वळ योगायोग म्हणावा लागेल कि हि दोन्ही व्यक्तिमत्व आपापल्या पक्षात, राज्यस्तरीय राजकारणात अव्वल स्थानावर आणि राजकीय हाडवैरी. पण जन्मतारीख मात्र एकच १२ डिसेंबर. विचारसरणी, कार्यपद्धती, समाजकारण आणि राजकारण करण्याच्या शैलीत भिन्नता असूनही साम्य एकच १२ डिसेंबर. कदाचित ही दोन व्यक्त

"आणि सज्ञान होतांना.."

"आणि सज्ञान होतांना.." पहिली एक दोन वर्ष सगळंच छान, गुडी गुडी असतं. नवीन असतं सगळंच. आजुबाजुचं वातावरण समजून घेणं, काही कळालं नाही तर विचारणं, मिळालं नाही तर हट्ट करणं. हट्ट पुरवणं आणि पुरवून घेणं. कसं छान निरगास असतं. थोडंसं काही झालं तरी लगेच रडू येणे, जराशी समजूत काढली की विसरून जाणं.... पुढे तिसर्या ते पाचव्या वर्षात बोलायला यायला लागतं.  एकमेकांचे शब्द समजतात.  मग एकमेकाशी बोलणं आणि एकमेकाला बोलणं दोन्ही सूरू होतं. थोडाफार अट्टाहास वाढतो. मी म्हणेन तेच खरं असं वागायला सुरुवात होते. बघा ना जसं मुल जन्माला आल्यापासून त्याची वाढ होत असते तसंच काहीसं वैवाहिक जीवनाची सुरुवात आणि वाढ होत असते. सहाव्या वर्षा नंतर मग ह्या दांपत्य जीवनाची शाळा सुरु होते. दरवर्षी नवीन इयत्ता, नवीन निर्मिति, नवीन अनुभव, नवीन शिक्षण आणि असं बरंच काही. एकमेकांचे अभ्यास करत, रोज एक नवीन परीक्षा देत. ती कधी पास तर कधी नापस होत पुढच्या वर्गात जाणं चालू असतं. असं करत करत दहा बारा वर्ष सरतात आणि Thirteen मधलं Teen Age  (किशोर वय) येतं. जरा स्थिर स्थावर झालेलं, एकमेकाला बर्यापैकी समजलेलं आणि स

"वपुर्वाई"

"वपुर्वाई"             काल व.पु. काळेंची पुण्यतिथी होती. तशी ती दरवर्षीच येते. मग आजच का लिहिलं? एवढ्या वर्षात का नाही लिहिलं? किंवा मग पुढच्या वर्षी पण लिहणार का? वगैरे प्रश्न कोणाला जर पडले असतील तर त्याची उत्तरं त्यांनी माझ्या सदाशिव पेठेतल्या घरी येऊन घ्यावीत.  वपुंच्या भाषेत सांगायचं तर "लोक काय म्हणतील? याची पर्वा करायची नाही. म्हणजे माणसाला सुख लागतं" तसंच आज सुचलं, आज लिहिलं आणि आज तुमच्या समोर मांडतोय बस इतकंच. "गोली मार भेजे मे, भेजा शोर करता है.." हे सत्या मधलं गाणं मला नेहमी आठवतं. वपु समजायला आणि वाचायला हा भेजा कधीच कमी येत नाही. काळजात पोचणार असं हया माणसाचं लिखाण आहे म्हणून मग गोली मार भेजे मे असं म्हणून काळजातूनच ते वाचण्यात मजा आहे. जीवनात, तारुण्यात वपु येणे (पुस्तकंरुपी) हे कोणत्याही व्यक्तीच्या भाग्यात असावं लागतं. ते मखमली गवतांवरचे फुलपाखरा सारखे, विविध फुलांवर उडण्याचे दिवस आणि सोबतीला वपुंचे एखादं पुस्तक. तुम्ही एकीकडे वाचत आहात आणि रोजचं उडणं चालू आहे.  अगदी कोणताही कथासंग्रह आणि त्यातली कथा घ्या, तुम्हाला तुमच्या आयुष्यात घ