मोदी तुमसे बैर नहीं! लेकीन.... “What Got You Here Won't Get You There” ह्या जग विख्यात Marshall Goldsmith लेखकाच्या पुस्तकाचं उत्तम उदाहरण म्हणजे "नरेंद्र मोदी" तसं आमचं मूळ गाव बारामती म्हणजे पणजोबा मूळचे बारामतीचे आणि वडिलांपासून आम्ही पुण्यात राहतोय. मी बारामती-कम-पुणेकर असल्यामुळे कुठल्याही नवीन ठिकाणी गेलो की दोन गोष्टी आवर्जून करतो. एक स्थानिक पदार्थांची खव्वयेगीरी (पुणेकर) आणि दुसरी म्हणजे तेथील स्थानिक राजकारणाची हेरगिरी. २०१८ला मी सहकुटुंब राजस्थानात गेलो होतो. राजस्थानच्या निवडणुकांचा प्रचार चालू होता. तेव्हा स्थानिक रिक्षावाले, पानवाले, ठेलेवाले ह्या सगळ्यांकडून एकच वाक्य कायम ऐकायला मिळत होते "मोदी तुमसे बैर नहीं! लेकिन रानी तेरी खैर नहीं!". नंतर झालेही तसेच. भाजपने एवढा जोर लावूनही राजस्थानात अपयश आलेच आणि ह्याचे एकमेव उत्तर वरच्या स्लोगन मध्ये आहे. २०१४च्या केंद्रातल्या दणदणीत यशानंतर पुढील काही निवडणुकांमध्ये पक्षानेही राज्या-राज्यात आपली गुढी सर्वत्र उभारली. २०१८नंतर मात्र चित्र फिसकटत गेलं. काय आणि का झालं हे ? हयाचा प्रामुख्याने सखोल विचार...
तुमच्या - माझ्या, मनातलं भावविश्व …..आणि बरंच काही