#latepostednow फाइल्स Reopened सिनेमाची सुरुवात त्याच्या क्लायमॅक्स पासूनच होते. ती सुरुवात होते तुमच्या आमच्या मनात. सिनेमाचा शेवटचा सीन संपतो आणि अचानक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री अशी पाटी येते. खरं सांगायचं तर आधीच्या तीन तासात आपण कलम ३७० आणि काश्मीरमय होऊन जातो. १९९०च्या काश्मीरमधील आपण जणू एखादा स्टींग ऑपरेशनचा कॅमेरा किंवा खोर्यातील पानझडी झालेलं सूरुचं झाड झालेलो असतो. एक एक प्रसंग पुढे पुढे सरकत असतात आणि साधारण पावणेतीन तास झाल्यावर अंगावर काटा आणणार्या एका प्रसंगानंतर अचानक ब्लॅक आऊट होतं. "फिल्म निर्माण विवेक अग्निहोत्री" अशी पाटी येते. अख्खं थिएटर भानावर येत. एकदम लक्षात येतं की "अरेच्या आपण थिएटरच्या खुर्चीत बसलो आहोत". लाइट्स ऑन होतात. प्रेक्षक जागेवरच बसलेले दिसतात. काही मिनिटांनी एक एक जण उठत जातो. आपणही थिएटरच्या बाहेर पडतो. परंतु सिनेमाला इथूनच सुरुवात झालेली असते. तीन तास बघितलेला विविध पात्रांचा, प्रसंगांचा, ठिकाणांचा आणि वातावरणाचा एक मुक सिनेमा आपल्या प्रत्येकाचा मनात सुरू होतो. तसं पाहिला गेलं तर १९९० साल म्हणजे फारसं लांब नाही. इतिहासात...
तुमच्या - माझ्या, मनातलं भावविश्व …..आणि बरंच काही