Skip to main content

Posts

Showing posts from August, 2022

Present Value (PV) of चारमिनार

  "Present Value (PV) of चारमिनार" हैदराबादच्या पाण्यात आणि तिथल्या हवेत काही निराळी रसायन असावीत. ह्या हैदराबादनी आपल्या देशाला असे "पी व्ही" दिले की ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात एक अमुलाग्र बदल घडून आणला. एक होते Father of Indian Economic Reforms म्हणजे "पी व्ही नरसिंहराव". पी व्ही नरसिंहराव हे १९९१ -९६ या पाच वर्षात भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होते. काँग्रेसच्या सर्वसाधारण परंपरेला छेद देत प्रथमच एक बिगर गांधी-नेहरू पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द उदयास आली. अर्थातच ती खणखणीत वाखाणण्याजोगी होती. १९९१ साली पीव्हींनी ऐतिहासिक आणि क्रांतिकारक अर्थसंकल्प मांडला. ह्या अर्थसंकल्पाचे जनक होते डॉक्टर मनमोहन सिंग परंतु त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले ते पी व्ही नरसिंहराव. या अर्थसंकल्पाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे GATT करार. ( General Agreement on Tariffs and Trade) भारताच्या वाटचालीत नवीन आर्थिक पर्व त्या क्षणी सुरू झाले. ज्याचे वर्णन खाजगीकरण किंवा जागतिकीकरण असे कायम करण्यात आले. परंतु ह्यास आपण उदारीकरण असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. आज सर्वज

रोज़ रोज़ आँखों तले

रोज़ रोज़ आँखों तले...   Happy Birthday गुलज़ार साहब सुमधुर, मधाळ, रसरशीत, मदहोश, दर्दभरं अहो किती विशेषणं लावू कमीच पडतील. असे हे साधारण ऐंशीच्या दशकातील रोमँटिक गाणं. "रोज़ रोज़ आँखों तले" पडद्यावर रुक्ष ठोकळा संजय दत्त, त्याच्या जोडीला मनमोहक आकर्षक सुंदर दिसणारी मंदाकिनी. मंदाकिनी म्हणलं की कायम 'राम तेरी गंगा मैली' एवढंच सगळ्यांना आठवतं. हया गाण्यात मात्र जी काय गोड आणि लोभस दिसलीय ना त्याला खरंच तोड नाही. तीच्या मन मोकळ्या वावरामुळे संजुबाबाचा "ऐ बावा"पणा झाकला गेलाय हे मात्र नक्की. सिनेमावरील चर्चेच्या भाषेत सांगायचं तर हे गाणं मंदाकिनीनं पडद्यावर खाल्लंय. संपूर्ण गाणं कॅमेराच्या ब्लर (धुसर) तंत्रज्ञानाचा बॅकग्राउंड च्या स्वरूपात उपयोग करुन चित्रीत केलंय. साधारणतः संध्याकाळ ते रात्र याच्या मधल्या वेळच्या वातावरणात चित्रीत केलं गेलं आहे. त्यामुळे संध्याकाळचा तो प्रेमातला बेचैन, बेधुंद माहोल या गाण्याला अजूनच टवटवीत रोमँटिक करतो. गाणं संपतं तेव्हा पहाटेचा सुर्य उगवतांना दिसतो. दिग्दर्शक राज सिप्पीच्या कल्पना विस्ताराचं कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. "रो