वाढदिवस
अजूनही दरवर्षी मनात तोच लहानपणीचा वाढदिवस रुंजी घालतो. साधं होतं सगळं. कधी कधी होतं तर कधी नव्हतं. नवीन कपडे गोडधोड आणि थोडीफार मित्रमंडळी. पेन्सिल, पेन, तर कधी बिस्कीटचा पुडा अश्या गिफ्ट. अर्थात तो वाढदिवस लोकल (Local)असायचा.
गेल्या १०-१५ वर्षात सोशल मीडियानी आपल्या सगळ्यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने ग्लोबल (Global) केलाय.
जपानच्या "टोकियो" पासून ते कॅलिफोर्नियाच्या "सॅन फ्रान्सिस्को" पर्यंत. तर ऑस्ट्रेलियाच्या "ब्रिस्बेन" पासून आर्यलंडच्या "डब्लिन" पर्यंत. शुभेच्छांचे वर्षाव आपल्याला लाभतात. कधी स्वतः आठवण ठेवून, तर कधी फेसबुक नी आठवण करून दिल्यावर. तर कधी आधीचे चार दिवस आठवण ठेवून. कित्येक मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि ओळखीची मंडळी जगभरातून आपल्याला आवर्जून शुभेच्छा देतात.
happy birthday.फक्त दोनच शब्द. किती साधे सोप्पे सरळ पण काय ताकद असते ना ह्या शुभेच्छा मेसेजेसची. आनंद आणि खुशी मिळतें ती काही औरच.
हो ना !
अमेरिकेतल्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत मोठ्या पदावर काम करणारा शाळेतला एखादा मित्र, जो कधी शाळेत असताना फक्त शिक्षक हजेरी घेताना माहिती असायचा. एरवी शाळेत वर्गात असूनही ज्याच्याशी जास्त संबंध आला नाही असा एखादा अमित, प्रकाश, जोशी, कुलकर्णी, काळे, बारटक्के, भोसले आपल्याला आवर्जून मेसेज करतो. whatsapp वर शाळेच्या ग्रुप वर जेव्हा happy birthday च्या बुंदी पडत असतात तेव्हा असा एखादा मेसेज मन सुखावून टाकतो. भले कधी औपचारिक असेल पण ते दोन शब्द आपल्याला आनंद देतात. हे वेगळाच काहीतरी आहे हे नक्की.
कोणी तुमच्यावर एखादा शॉर्ट मेसेज पाठवतं, कोणी कविता करतं, तर फेसबुक वर एखादा जुना फोटो attach करून तुम्हाला birthday tag करतं.
ऑफिसचा, राहत असलेल्या सोसायटीचा ग्रुप, एखादा क्लासचा, सकाळी फिरायला भेटणारा ग्रुप, जुन्या मित्रांचा, शाळा-कॉलेज असे एक ना अनेक What'sApp ग्रुप आणि अनेक Facebook Friends.
सगळे जणू तुम्ही कोणी Celebrity च
आहात अश्या थाटात, विविध social media माध्यमांवर तुम्हाला शुभेच्छा देत असतात.
अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है।
अगदी असंच काहीसं
"पुरी कायनात तुम्हे शुभेच्छा देने के लिये हाजीर होती है"
दरवर्षी हा एक वेगळा अनुभव असतो. पुन्हा पुन्हा नव्याने मिळणारा आनंद असतो. जो तुम्हाला दिवसभर तुम्ही कोणी भारी असल्याचा feeling देतो. कधी त्याचवेळेस एखाद्या स्पेशल माणसाचा, आवडत्या मित्राचा, महत्वाच्या नातेवाईकांचा जर चुकून इथे कुठेच मेसेज आला नाही तर थोडी रुख रुखं पण लावतो.
सगळ्यांना लाईक करणं, Thank you चा मेसेज करणं हा पण एक वेगळाच कार्यक्रम असतो. परत परत वाचताना मस्त वाटतं. आपणही अगदी उत्साहाने ही जबाबदारी पार पाडतो.
अर्थात अजूनही समक्ष भेटून, एकत्र येऊन आणि एकत्र "बसून" वाढदिवस साजरा करण्यातली मजा कोणी हिरावून घेऊ शकत नाही. वाढदिवसाची पार्टी मागण्यात आणि देतो रे..देतो रे म्हणत एकदा जंगी पार्टी देण्यात आणि घेण्यातली माझा वेगळीच.
दिवस संपतो..रात्री उशिरापर्यंत हा देवाण घेवाण कार्यक्रम चालू असतो. झोप कधी लागते कळत नाही. दुसऱ्या दिवशी पहाटेचा गजर होतो. तेव्हा जाग आल्यावर पुन्हा नव्याने Good Morning मेसेजेस यायला चालू झालेले असतं.
आज तुम्ही सर्वांनी प्रेमानी आणि आठवणीने मला सोशल मीडियाच्या विविध मध्यामांवर, तसेच फोनवर आणि समक्ष भेटून भरभरून शुभेच्छा दिल्यात. दरवर्षी देता, आणि पुढेही देत राहाल. त्याबद्दल कायम आभारी होतो, आहे आणि राहीन.
२१व्या शतकात, वाढदिवस खऱ्याअर्थाने Local Vocal आणि Global झाला आहे.
Thank you
मनापासून धन्यवाद
- मिलिंद सहस्रबुद्धे
सदाशिव पेठ पुणे ३०
Comments
Post a Comment