Skip to main content

हिमालयाची सावली

 हिमालयाची सावली




आपण आतल्या खोलीत असतो आणि बाहेर TV वर एखादी मालिका किंवा सिनेमा चालू असतो. त्यातील काही संवाद आपल्याला आत ऐकू येतात. आपण आतूनच "अगं, विक्रम गोखले ना? बघ बरोबर ओळखलं की नाही!"
अभिनया बरोबर आपल्या आवाजाचीही कडक ओळख असणाऱ्या मोजक्या अभिनेत्यां पैकी एक आवाज आज कायमचा हरपला.
पणजी दुर्गाबाई कामत, आजी कमलाबाई आणि वडील चंद्रकांत गोखले अशी अभिनयाची हिमाच्छादीत शिखरे. ह्या सर्वांना सलाम करणारं ह्याच कुळातले अभिनय क्षेत्रातील हिमशिखर
म्हणजे विक्रम गोखले.
बॅरिस्टर नाटकामधील गाउन घातलेला, तोंडात सिगारेटचा पाइप आणि हातात पुस्तक घेऊन करारी खरज्यात संवाद म्हणत त्याचा तो विशिष्ठ पौज घेणारा वकील
म्हणजे विक्रम गोखले.
अमिताभ बच्चन समोर अग्निपथ मधील कमिशनर गायतोंडे आणि खुदागवाहमध्ये जेलर रणवीरसिंगच्या भूमिकेत तेवढ्याच ताकदीने अभिनय साकारणारा अधिकारी..
सलमान आणि ऐश्वर्याच्या प्रेमात विघ्न आणणारा हम दिल दे चुके सनम मधील अस्खलित शास्त्रीय गायक पंडित दरबार
म्हणजे विक्रम गोखले.
लग्न संस्थेची मर्यादा ओलांडून ही आपला वाटणारा, कळत नकळत मधील मनोहर देसाई
निवडणुकीच्या राजकारणात उभी-आडवी, तिरपी कशीही चाल करु शकणारा वजीर -पुरषोत्तम कांबळे
म्हणजे विक्रम गोखले.
या सुखांनो या मधील डावीकडे वळून एका नजरेच्या कटाक्षाने आश्वासक संवाद साधणारे दादा अधिकारी
गाजलेल्या अग्निहोत्र मालिकेतील साकारलेला गुढ गंभीर मोरया
म्हणजे विक्रम गोखले.
साधारण १०० हून अधिक हिंदी-मराठी सिनेमात आपल्या अभिनयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटविणारा हाडाचा सच्चा रंगकर्मी
म्हणजे विक्रम गोखले.
नाटक, सिनेमा आणि दूरदर्शन मालिका ह्या तिन्ही अभिनय क्षेत्रातील महानायक.
म्हणजे विक्रम गोखले.
सामाजिक कार्य आणि वडिलोपार्जित लाभलेली प्रखर देशभक्ती तेवढ्याच ताकदीने पुढे नेणारा सावरकरभक्त
म्हणजे विक्रम गोखले.
हिमालयाची सावली ही हिमालयाहून ही मोठी होऊ शकते हे दाखवून देणारा सुपुत्र
म्हणजे विक्रम गोखले.
बोलके डोळे, गोल चेहरा, गोरी कांती, सरळ नाक आणि करारीपणा उमटणारा चेहरा कायम लक्षात राहील.
विक्रम गोखलेजी तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली
© मिलिंद सहस्रबुद्धे
२७/११/२०२२
सदाशिव पेठ पुणे ३०

Comments

Popular posts from this blog

रस्ता..

 रस्ता.. घरातून घाईघाईने निघतांना मनात काय काय चालू असतं ना. वेळेत पोहचू की नाही, वाटेत ट्रॅफिक चा शॉट नसेल ना. दुपारी लंच नंतर महत्वाची मिटींग आहे आज. त्यात काय दाखवायचं, काय बोलायचं. संध्याकाळी आल्यावर काय स्वयंपाक करायाचा... सकाळची पोळी भाजी पटापट आवरली. सगळ्यांना आवडते म्हणून कांदा टोमॅटो कोशिंबीर केली, त्यात जरा वेळ गेला.  परवा जेवताना मी आईला असं पटकन बोलायला नको होतं. सारखं मनात तेच येतयं, बघू जमलं तर योग्य वेळ बघून विषय क्लिअर करेन. असं असं बोललं तर? पण, आवडेल का तीला ते, नको जरा सामोपचाराने सविस्तर बोलू.  बापरे लाल पडला का? गेली इथंच ३ मिनिटे. पुढच्या चौकातला सिग्नल continued मिळाला तर बरं. वेळेत पोहचले म्हणजे झालं, मोठे सर यायच्या आत. वा सुटला बाबा, इथं जरा गाड्या कमी आहेत ते एक छान आहे. पुढच्या रविवारी ताई येणार घरी. त्यांना येताना कयानीचे केक आणायला सांगते. हल्ली कैम्पात जाणं होतंच नाही. ताई येणार म्हणजे घर चकाचक आवरणं आलं. नाहीतर सासुबाईंन समोरंच ऐकावं लागेल. हसुंच येतं मला दरवेळेस कितीही आवरलं तरी काही तरी असतंच त्यांचं.  "अहो अहो" आजोबा रस्त्यातच काय म...
"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ...

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...